स्थानिक कलावतांना व्यासपीठ उपलब्ध करुन द्यावे ; अभिनेते सिद्धार्थ जाधव यांचे मत

Foto

आज भावी कलावंत मुंबईसारख्या ठिकाणी व्यासपीठ मिळण्यासाठी झटत आहे. अनेकांमध्ये चांगले गुण असूनही ते निराश होतात. प्रत्येक शहरानेच आपआपल्या स्थानिक कलावतांना चांगले व्यासपीठ उपलब्ध करुन दिले पाहिजे. स्थानिक कलावंताच्या कलेचा विकास होण्यासाठी प्रयत्न केले गेले तर प्रत्येक कलावंताला मुंबईमध्ये जाऊन चांगले व्यासपीठ शोधण्याची गरज पडणार नाहीअसे मत अभिनेते सिद्धार्थ जाधव यांनी व्यक्त केले. 

सर्व लाईन व्यस्त आहे’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेते सिद्धार्थ जाधव हे औरंगाबादमध्ये आले. यावेळी त्यांच्याशी दै. सांजवार्ताने संवाद साधला असता त्यांनी भावी कलावंतानी संयम ठेवला पाहिजे. कुठलेही यश सहजा सहजी मिळत नाही. त्यासाठी खूप मेहनत करायची तयारी ठेवावी असे भावी कलावंताना आवाहन केले. तसेच ते म्हणाले कीआम्हीही 20-20 वर्ष मेहनत केली आहे. मराठीहिंदी चित्रपटात काम करताना आम्हालाही समस्या आल्या आहेत. त्यामुळे कलावांनी मेहनत करावी. तसेच सकाळ झाली की सर्वांना वॉटस्अपफेसबुकवर शुभप्रभात बोलले जाते. परंतु घरात आई-बाबांना मात्र कुणीच शुभप्रभात कुणीच बोलत नाही. घरात आई वडिलाच्या सहकार्याशिवाय यश मिळू शकत नाही. आई-विडलांच्या सहकार्यामुळेच मी आज काम करत असल्याचेही सिद्धार्थ यांनी स्पष्ट केले. 

दुसर्‍यांच्या आयुष्यात डोकावण्यापेक्षा स्वतःचे आयुष्य सुधारा

आत्मविश्‍वासाने काम केले पाहिजे यश मिळवायचे असल्यास स्वतःच्या आयुष्यात काम सुरु आहे हे पाहिले पाहिजे.परंतु दुसर्‍यांच्या आयुष्यात काय चालेले आहेदुसरे काय करत आहेतयाकडेच जास्त लक्ष दिले जात आहे. परंतु स्वतः आयुष्य सुधारण्यासाठी प्रयत्न करावे असेही सिद्धार्थ जाधव यांनी सांगितले. तसेच आज स्पर्धा खूप आहे. स्पर्धेत टिकण्याच्या नादात दुसर्‍यांचा विचार करणेच अनेकजण विसरले आहे. ईशाद्वेष या भावना दूर ठेवल्या पाहिजेअसेही सिद्धार्थने सांगितले. 

व्यसन करणार्‍यांबरोबर मी सेल्फीही काढत नाही

ऐवढे सुंदर आयुष्य आहे. परंतु आज अनेकजण व्यसनाकडे वळताना दिसतात. तरुण पिढीही अज्ञाज दारुसिगारेट पिताना दिसतात आतातर पार्टी म्हटले की दारुच असा समज अनेकांचा झाला आहे. व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. त्याऐवजी योगा योगा करा. जीवनात खुप काही गोष्टी करण्यासारख्या आहेत. असेही सिद्धार्थ म्हणाले. मी प्रत्येकाबरोबर सेल्फी काढतो. परंतु व्यसन करणार्‍यांबरोबर मी सेल्फीही काढत नसल्याचेही अभिनेते सिद्धार्थ यांनी स्पष्ट केले. चित्रपटात बाब्याच्या भूमिकेत सिद्धार्थ स्वतः दिसणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच सौरभ गोखलेने समीरची भूमिका साकारली आहे. समिरच्या आयुष्यात येणार्‍या मुलींची भूमिका संस्कृती बालगुडेस्मिता शेवाळेहेमांगी कवी नीथा शेट्टीआणि राणी अग्रवाल या अभिनेत्रीनी साकारली आहे. तसेच अभिनेते महेश मांजरेकरही यात दिसणार आहे. गडबडे बाबा या  व्यक्तीने धमाल डायलॉगबाजी करुन प्रेक्षकांना हसविण्याचा यात प्रयत्न केला आहे. महेश मांजरेकर ही भूमिका साकारणार आहे. आयुष्य प्रेम नाही ना केलं तर ते आयुष्य व्यर्थ आहे असे सांगणारा सर्व लाईन व्यस्त आहेत. चित्रपट असल्याचेही कलावंतांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.